You are currently viewing सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल आणि शासकीय रुग्णालयाची घोषणा फक्त कागदावरच राहणार – परशुराम उपरकर

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल आणि शासकीय रुग्णालयाची घोषणा फक्त कागदावरच राहणार – परशुराम उपरकर

सावंतवाडी

जिल्ह्यात शासकीय रुग्णालय आणि सावंतवाडीत मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल या सत्ताधार्‍यांच्या घोषणा कागदावरच राहतील. या घोषणा जिल्हावासीयांसाठी मृगजळच ठरणा-या आहेत, असे सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले.
आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी कोरोनाच्या काळात आवश्यक असलेली सेवा हे देवू शकत नाही, मग ही आश्वासने कशी पुर्ण करणार? असा ही सवाल श्री.उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.
सत्ताधारी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक काहीच काम करत नसल्याने आम्ही विरोधकांची भुमिका बजावत असल्याचे श्री. उपरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा