हळवल फटकानजिक एक लेन्थ बंद असल्यामुळे वाहन चालकाचा नाहक बळी; स्थानिक ग्रामस्थ आक्रमक..
कणकवली :
गोव्याच्या दिशेने मालवाहतू करणाऱ्या कंटेनरची समोरून येत असलेल्या क्रुझर चारचाकीला जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला. गडनदी पुलानजीकच्या वळणावर शुक्रवारी दुपारी २.३० वा. सुमारास झालेल्या या अपघाताची भीषणता एवढी होती की, चारचाकीचा पूर्णत: चेंदामेंदा झाला आहे.परिणामी क्रुझर चारचाकाच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला.
गडनदी पुलापुढे वागदे गावाच्या हद्दीत हायवेची एक लेन बंदावस्थेत आल्याने हा अपघात घडत आहेत. येणारी – जाणारी वाहने एकाच लेनवर येत असल्याचे सातत्याने अपघात घडत असतात. याकडे महामार्ग प्राधिकरणाचा निष्काळजी पणा कारणीभूत ठरत आहे.असा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत ही बंद लेन सुरू केली जात नाही. तोपर्यंत मृतदेह उचलायला देणार नाही. असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
यावेळी यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश ढवळ, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, विलास गावकर, बाबू सावंत, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे आदींसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.