मालवण
कसाल मालवण रस्त्यावरील रानबांबुळी व सुकळवाडला जोडणाऱ्या पुलाजवळ रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर चिखल झाल्याने मोठे खड्डे पडले आणि वाहनचालकांसाठी व पादचाऱ्यांनसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. या ठिकाणी लहान मोठे मोटरसायकलचे अपघात होत असतात तसेच या नवीन बांधलेल्या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने आता या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवघ्या काही दिवसावर गणेश चतुर्थी हा सण येऊन ठेपला आहे. कसाल मालवण मार्गावर अहोरात्र वाहतूक चालू असते. तसेच कसाल वरून मालवणला जाणारे पर्यटकांची वाहने यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी होते. बांधकाम विभागाने यावर तात्काळ उपाययोजना करावी व गणेश चतुर्थी पूर्वी रस्ता वाहतुकी सुरळीत करावा अशी मागणी वाहन चालक, पर्यटक, ग्रामस्थ, पादचाऱ्यांमधून केली जात आहे.