You are currently viewing शिवापूर येथील बहिष्कारचा वाद अखेर मिटला

शिवापूर येथील बहिष्कारचा वाद अखेर मिटला

कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सागर शिंदे यांनी केली यशस्वी मध्यस्ती

कुडाळ

तालुक्यातील शिवापूर गावात दोन कुटुंबावर घातलेला बहिष्काराचा वाद अखेर कुडाळ पोलीस ठाण्यात मिटला. प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी मध्यस्थीकरत,थळकर, दांडेकर कुटुंबासह कुळकर राजसत्तेच्या कुटुंबांचा एकोपा घडवून आणला. श्री देव रवळनाथ देवस्थानचे गावातील सर्वच मानकरी आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील देवस्थानातून निर्माण झालेले हेवे दावे आणि त्यामुळे झालेली एका दुसऱ्यावर बंदी यातून थळकर आणि दांडेकर कुटुंबावर बहिष्कार घातल्याची घटना घडली होती. मात्र हा वाद मिटला असल्याने यापुढे असा कोणताच प्रकार घडणार नसल्याचे सर्वांनीच मान्य केले आहे.
थळकर आणि आणि दांडेकर कुटुंबा सोबत यापुढे कोणाचेही वाद राहणार नाहीत. समज गैरसमज जे निर्माण झालेले होते ते यावेळी पोलीस उपनिरीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिंदे, हवालदार संजय कदम, माणगाव दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे हवालदार सखाराम भोई, हवालदार आनंद पालव,जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी सूर्याजी नाईक यांनी या प्रकरणी गावातील सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचप्रमाणे तक्रार असलेल्या थळकर आणि दांडेकर कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले दोघांमधील असलेल्या वादाचे मूळ शोधले. समज गैरसमजातून वाद वाढत गेले हे ग्रामस्थांच्याही लक्षात आणून दिले आणि त्यानंतर कोणती कामे कोणी करावी आणि कशा पद्धतीने गावात एकोप्याने राहावे याविषयी मार्गदर्शन करून सर्वच गावाचा एकोपा घडवून आणला. या घटनेनंतर एका दुसऱ्याची बोली चाली करणे,प्रत्येक कुटुंबाकडे ये जा करणे आणि सर्व समावेशक समाज व्यवस्थेत सर्वांना सोबत घेऊन सण उत्सव साजरे करण्याचा एक मुखी निर्णय यावेळी करण्यात आला. गावातील सर्वच मंडळी आणि मानकरांनी त्याला समर्थन देऊन बंदी आणि बहिष्कारच्या विषयाला कायमची मूठ माती दिली.
दरम्याच्या काळात ओरोस येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे एपीआय संजय दैवूर यांनी या दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करून नागरिकांचे हक्क आणि कायदा याबाबतची माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा