You are currently viewing कणकवली तालुका बार असोशिशन अध्यक्षपदी ॲड. अनिल बर्वे तर उपाध्यक्षपदी ॲड. प्राजक्ता शिंदे यांची बिनविरोध निवड

कणकवली तालुका बार असोशिशन अध्यक्षपदी ॲड. अनिल बर्वे तर उपाध्यक्षपदी ॲड. प्राजक्ता शिंदे यांची बिनविरोध निवड

कणकवली :

 

कणकवली तालुका बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा काल 22 ऑगस्ट, 2022 रोजी कणकवली येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये ॲड. अनिल बर्वे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी ॲड. प्राजक्ता शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी ॲड. स्वप्नील सावंत यांची तर खजिनदार पदी प्रतिमा सातवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कार्यकारणीच्या सदस्य पदी अक्षय चिंदरकर, ॲड. अजितसिंह काळे व ॲड. राधिका मुंज यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, कणकवली तालुका बारचे माजी अध्यक्ष ॲड. विद्याधर चिंदरकर, ॲड. बी. एम. दळवी, ॲड. राजेश परुळेकर, ॲड. उमेश सावंत, ॲड. एम. जी. रावराणे, ॲड. दीपक अंधारी, ॲड. विरेश नाईक, ॲड. प्रदीप सावंत, ॲड. मिलिंद सावंत, ॲड. विलास परब यांच्यासह वकील संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा