—- भाजपा पदाधिकारी यांचे आसोली ग्रामस्थांना अभिवचन
भाजपा पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम अधिका-यांसमवेत आसोली पुलाची केली पहाणी
गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला आसोली हायस्कूल समोरील पुल हा दिवसेंदिवस खचत चालला असुन , दरवर्षी त्या पुलाला मोठमोठे भगदाडे पडत आहेत . स्थानिक ग्रामस्थ दरवर्षी पडलेली भगदाडे काँक्रीट च्या सहाय्याने बुजवतात व वाहतूक सुरळीत करतात . परंतु बांधकाम विभागाकडे निधीची तरतूद नसल्याचे कारण देत दरवर्षी सदर कामाला निधी अभावी मंजुरी मिळत नाही . त्यामुळे पावसाच्या दिवसात ग्रामस्थांबरोबर शाळेत शिकणारया मुलांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो .
ह्यावर्षी सुध्दा सदर पुलाला मोठे भगदाड पडल्याने नियमित सुरू असलेली एस् टी वाहतूक बंद केली आहे .त्यामुळे २०० ते २५० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे . ही अडचण लक्षात घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. भगत यांना सोबत घेऊन त्या पुलाची पहाणी केली , तसेच लवकरात लवकर त्या पुलाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे बजेट मध्ये किंवा नाबार्ड योजनेमध्ये प्रस्तावित करावे असे सांगण्यात आले . तसेच सदर प्रश्नी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे लक्ष वेधून लवकरात लवकर या कामाला निधी मंजूर होण्यासाठी पाठ पुरावा करणार असल्याचे भाजपा शिष्टमंडळाने ग्रामस्थांना आश्वासीत केले .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , परबवाडा सरपंच पपु परब , जेष्ठ नेते प्रकाश रेगे , माजी सरपंच व महिला मोर्चाच्या सुजाता देसाई , ग्रा.पं.सदस्य व युवा मोर्चाचे संकेत धुरी , आसोली सरपंच रीया कुडव , बुथप्रमुख गुरुनाथ घाडी , ग्रामस्थ आत्माराम घाडी , नारायण घाडी , आनंद धुरी , देवेंद्र धुरी ,राकेश धुरी ,संतोष चव्हाण ,नंदा घाडी , विलास मेस्त्री इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .