You are currently viewing कशासाठी ?

कशासाठी ?

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलीस अधिकारी वासुदेव खोपडे लिखित अप्रतिम काव्यरचना

सोडुनिया अभिमान
व्हावे आंधळ्याची काठी
नाही देहाचा भरोसा
बोल गर्व कशासाठी ?

चार हातांची कबर
नाशिवंत देहासाठी
गगनचुंबी ईमारत
तुला हवी कशासाठी ?

नसे पोटावीन जीव
राबतोय पोटासाठी
दोन भाकरीचे पोट
धन हाव कशासाठी ?

येथे ठेऊन तिजोऱ्या
जाशील ऊघड्या मुठी
भ्रष्टाचार रे लबाडी
सांग केली कशासाठी ?

माझं माझं केलं सारं
नाही राम नाम ओठी
नाही पुत्र भार्या संगे
आप्त मोह कशासाठी ?

नको स्वार्थ अहंकार
क्षणभंगुर देहासाठी
पद, सत्ता,लोभ,माया
कशासाठी, कशासाठी ?

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा