*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कृष्ण कृष्ण*
कृष्ण नाम जप l
ध्यास लागे मनी ll
सावळा तो ध्यानी l
निरंतर ll…….१
मोरपीस शिरी l
दिसे वेणू हाती ll
गळ्यामध्ये शोभती l
पुष्प माला ll……२
कृष्ण की विठ्ठल l
मनी मी साशंक ll
सावळे कौतुक l
एकरूप ll……३
उत्पत्ती ती ब्रह्मा l
विष्णू तो पालक ll
शिव तो नाशक l
त्रिगुण हे ll….४
देवगण सारे l
जगाते उध्दारी ll
किमया ही सारी l
ब्रम्हांडात ll….. ५
ईश्वराचे रूप l
आसमंती असे ll
परमात्मा वसे l
दिगंतात ll……६
देव निराकार l
मानतो साकार ll
आहे तोच खरा l
परमात्मा ll…..७
उज्वला सहस्रबुद्धे