*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर (गोवा) लिखित अप्रतिम मुक्त छंद काव्य रचना*
*समांतर*
त्या संध्याकाळी पाऊस होता कोसळत……
तू तिथे पलीकडे
नि, मी अलीकडे….
दोघंही समांतर
पण, लक्ष एकाचठिकाणी
वाट बघत बसची…..
तू छत्रीतून हळूच बाहेर होतीस डोकावत
अनिमिष नेत्रांनी…. मंद स्मित
तुझ्या चेहऱ्यावरचे
त्या स्मितानेच केले घायाळ मला….!
पावसाचा जोर वाढत चाललेला….
तू पुसटशी हसलीस स्वतःशीच
मी तर पूर्ण पागल …….!
तुझ्या स्मितात पार बुडालेला…..
इतक्यात जोराचा वारा सुटला
छत्री उलटी झालेली तुझी, अन
तू हसलीस खळाळून….
ते तुझ खळाळणं….
मी पुरता पार पागल… घायाळ
मध्येच कधी बस आली न
तू निघून गेलीस कधी कळण्याच्या नादात…..
मी त्या खळखळ हसण्यात पूरा गाडून गेलो……!
त्या संध्याकाळी पाऊस होता कोसळत…….
सागराला मिळालेल्या सरीतेसम तुझ खळाळणं माझ्यात समरस झालेल….
तू होतीस सरिता माझी….
त्या संध्याकाळी….
मी ह्या किनारी
तू त्या किनारी…. दोघंही होतो समांतर…….!
न भेटणारे आपले होते मार्ग…..!
अजुनही आठवांच्या साठवणीत
आहे मात्र ती संध्याकाळ समांतर……!!
मानसी जामसंडेकर
गोवा