You are currently viewing ग्राहक पंचायतीचे काम ही साधना आहे. डॉ.विजय लाड

ग्राहक पंचायतीचे काम ही साधना आहे. डॉ.विजय लाड

वैभववाडी

माझ्या हातून जे कार्य होईल ते भगवंताचे पूजन होईल. सन २०४४ मध्ये भारत विश्ववंदिता होईल असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले.ते नाशिक येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय अभ्यास वर्गाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
नाशिक येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात दि.२० व २१ ऑगस्ट रोजी दोन दिवशीय राज्य अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास वर्गाला २५ जिल्ह्यातून ३५० कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिल्या दिवशी नाशिकचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिंगकर यांच्या हस्ते अभ्यास वर्गाचे उद्घाटन झाले.या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांसाठी काम करणाऱ्या ग्राहक पंचायतीस सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्य सचिव अरुण श्री. वाघमारे यांनी ‘कार्यकर्ता कसा असावा’, राज्य सहसंघटक मेघाताई कुलकर्णी यांनी ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्रची रचना व कार्यपद्धती’, विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय यांनी ‘विज ग्राहक जागृती-समस्या व निवारण’,दत्ता शेळके व सुधीर काटकर यांनी ई-दाखले यावर मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक चातुर्मास-२०२१ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तर रात्रीच्या सत्रात गजेंद्र क्षीरसागर यांनी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी
यांची घेतलेली मुलाखत दाखविली. यानंतर शरद वडगांवकर यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा कुलकर्णी यांचे चिंतन, प्रवासी महासंघ प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी ‘प्रवासी महासंघ एक संकल्पना’, गणेश परळीकर सहआयुक्त अन्न-औषध प्रशासन,मुंबई यांनी ‘अन्न व औषध दक्षता व प्रबोधन’, मुंबई ग्राहक आयोग सदस्य श्रद्धा बहिरट यांनी ‘नवीन सुधारित ग्राहक संरक्षण कायदा-२०१९’, सुधीर साळवे यांनी ‘वैध मापन शास्त्र’, प्रा.हेमंत वडणे यांनी ‘माहितीचा अधिकार’, कोकण विभाग अध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांनी ‘सजग विद्यार्थ ग्राहक प्रबोधन’ यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रम दरम्यान साधनाताई यांच्या हस्ते ज्ञानेश्वर महाजन (उद्योजक ), उदयन दीक्षित(व्यापारी), चंद्रकांत वाघ (शेतकरी), सुनीता पाटील (श्रमिक), मन्दोदरा कापडणीस (ग्राहक),अलमशाह मोमिन (उत्कृष्ट कार्यकर्त्ता) यांना पंचप्राण तर ज्येष्ठ साधक लक्ष्मण गव्हाणे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात आला. नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, कोकण विभाग अध्यक्ष प्रा. एस. एन पाटील यांचा सत्कार राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केला.
डॉ. विजय लाड समारोप प्रसंगी पुढे म्हणाले, विश्व वंदिता भारत होण्यासाठी, महाराष्ट्रात ७५ ग्राहक मार्गदर्शन केंद्र ,शाळा- महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ग्राहक जागृत केली जाणार असल्याचे सांगितले. या अभ्यास वर्गाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागातून प्रा.एस.एन.पाटील, डॉ संजीव लिंगवत, श्री.रत्नाकर कोळंबकर, प्रणिता वैराळ, श्री. दिनेश बेरीशेट्टी, श्री.नवीन पांचाळ, ॲड. हर्षा चौकेकर, श्री.कमलेश कोरपे व डॉ. संजय सावंत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा संघटक श्री. दत्ता शेळके यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.महेश मुदगल, मनीषा सोलुंखे तर आभार प्रदर्शन सुरेशचंद्र धारणकर यांनी केले.राज्य सहसंघटक मेघा कुलकर्णी यांच्या पसायदानाने समारोप करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा