मालवण :
मालवण तालुक्यातील बॅ. नाथ पै सेवांगणाच्या वतीने श्री गणेशाचे स्वागतासाठी २६ ऑगस्ट रोजी सेवांगण येथे मोदक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात उकडीचे मोदक, सारण चॉकलेट मोदक, चॉकलेट मिक्स मोदक, मँगो मोदक, रोझ गुलकंद मोदक, पान मोदक, पिनट मोदक, रोझ संदेश मोदक, काजू मोदक, मावा मोदक, टूटीफ्रूटी मोदक हे सर्व प्रकार शिकवले जाणार आहेत. हे प्रशिक्षण शिबिर २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत होणार आहे. यासाठी ३०० रुपये प्रशिक्षण शुल्क ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दुपारचे जेवण सेवांगणाच्या वतीने दिले जाणार आहे. प्रशिक्षण शिबिरात प्रवेश मर्यादित आहे. इच्छुकांनी आपली नावे २४ ऑगस्टपर्यंत नोंदवावी. अधिक माहितीसाठी सेवांगण कार्यालय फोन ०२३६५ – २५२२५०, मोबा. ९४२३९४६००३, ९४२१५६९७०४ येथे संपर्क साधावा असे, आवाहन सेवांगणचे अॅड. देवदत्त परूळेकर, अध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाहक लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.