You are currently viewing महिलांच्या सुरक्षेबाबत कडक कायदे करावेत – सौ आरती पाटील

महिलांच्या सुरक्षेबाबत कडक कायदे करावेत – सौ आरती पाटील

कुडाळ तहसीलदारांना निवेदन

कुडाळ

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला अत्याचारात लक्षणीय वाढ झालीय आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे राज्यांतील काही कोव्हिडं सेंटर ही महिला अत्याचाराची केंद्रे बनली असून येथे कोरोनाची लागण झालेल्या महिला उपचारासाठी दाखल होण्यास देखील घाबरत आहेत. उमरगा येथे दलित महिला कामगारावर झालेला सामूहिक अत्याचार असुदे अथवा गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात झालेल्या घटना असुदेत, यापैकी कुठल्याही घटनांची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही आणि सरकारच्या याच निष्क्रीयतेमुळे आरोपींना कायद्याचा धाक राजिलेला नाही. सरकार आणि कायदा आपलं काही बिघडवू शकत नाही अशी खात्री झाल्याने मोकाट झालेल्या नराधमांपासून महिलांना संरक्षण मिळावं यासाठी आज भाजपा महिला मोर्च्या महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात महिला तालुकाध्यक्ष सौ. आरती पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसीलदार यांना महिला संरक्षण विषयक त्वरित कडक कायदे बनविण्यात यावेत अश्या स्वरूपाच निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सौ. दीप्ती पडते, सौ. लक्ष्मी आरोंदेकर जिल्हा चिटणीस, सौ अदिती सावंत जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सौ दीपा काळे किसान मोर्चा, सौ ममता धुरी शहराध्यक्ष, सौ साक्षी सावंत नगरसेविका, सौ अश्विनी गावडे नगरसेविका, सौ साधना माडये शहराध्यक्ष पिंगुळी, सौ प्रिया पांचाळ ग्रामपंचायत सदस्य, सौअस्मिता शिरपुटे, सौ रेवती राणे, सौ. शेजल वेंगुर्लेकर इत्यादी उपस्थित होत्या

प्रतिक्रिया व्यक्त करा