You are currently viewing अंतर…

अंतर…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*

*अंतर…*

वाढत आहे दोघांमध्ये आता अंतर…
न छेदणारी भासत आहे रेघ समांतर!

विस्तव नाही जात कधीही मधून त्यांच्या…
जगास कळले प्रेम तयांचे आहे वरवर!

साधे होते जगणे येथे अवघड केले…
लोभापायी प्रवास झाला अधिक खडतर!

नाही येणे सोबत काही माहित आहे…
तरी सरेना करीत राही उगाच मरमर!

किती जगावे परीक त्याच्या कसे जगावे…
विचार साधा करील तुजला हा अजरामर!

जयराम धोंगडे, नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा