You are currently viewing स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला पण….?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला पण….?

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख

 

आपल्या भारतावर ईंग्रजांनी दिडशे वर्ष राज्य केले आणि १९४७ ला आपला भारत देश स्वतंत्र झाला या दरम्यान ईंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाचे बलीदान दिले अनेक क्रांतीकारकांनी भारत मातेसाठी रक्ताचा अभिषेक करून म्रुत्युदंड स्विकारला,भारतदेशाच्या मुक्ततेसाठी अनेक देशभक्तांचे बहुमोल योगदान आहे.क्रांतीच्या लढाईत अनेकांना शहिद व्हावे लागले.भारत मुक्तीसंग्रामसाठी राजगुरू,भगतसिंग, सुखदेव,वासुदेव बळवंतफडके पासून ते मंगलपांडे विरसावरक आणि कितीतरी क्रांतिकारकांपर्यंत अनेकांनी मरण यातना भोगून ईंग्रजांना भारतातून हद्दपार केले.भारताचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहित आहे वाचला आहे. ईंग्रजांच्या कालखंडात अनेक सुविधा आल्यात त्यांनी त्याच्या हितासाठी विकासाची कामे केलीत ती आजतागायत शाबूत आहेतं.भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताने प्रचंड प्रगती केली व्यापार,व्यवसाय उद्योग,औद्योगिक अशा अनेकानेक क्षेत्रात दैदिप्यमान क्रांती केली.संगणक इंटरनेटचे जाळे जगभर पसरले,मोबाईल,नेट बँकेचे युग आले आणि बघताबघता देश बदलला माणसं बदललीत शिक्षण क्षेत्रात माणसाने प्रचंड प्रगती करून आज भरत सर्वक्षेत्रात सर्वाधिक पुढे आहे.यात महिलाही मागे नाही.विकसित शिक्षणाच्या जोरावर आज प्रत्येक स्त्री,पुरूष प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्चो पदावर विराजमान होवून सर्वोत्कृष्ट कामगिरी करतांना आपण पहात आहोत वाचत आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज.आपल्याला प्रगत, प्रगल्भ,सशक्त भारत बघायला मिळतो आहे. म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. स्वातंत्र्याची पंच्याहत्तर साजरा करताना भारतीयांच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता.पण हे सार करत असतांना कुठेतरी कमतरता जाणवत होती.खरतर भारत बदलला त्याच बरोबर समाजकारणाचा ध्यासघेवून राजकारण करणारे पुर्वीसारखे नेते आज नाहीत.खरतर सध्याच राजकारण पुर्णतःबदलले आहे.पुर्वी देशहितासकट जनतेच्या हिताचा विचार करून राजकारण करत होते.देशाचा व जनतेच्या भल्याच्या विचार करून जनतेने दिलेल्या सत्तेचा जनतेच्या हितासाठीच उपयोग करायचे.पण आज राजकारणाचे रंगरूप बदलेले आहे सध्याच्या काळात सत्तेचा कसा उपयोग होतोय हे नव्याने सांगायला नको. नव्या पिढीला दुषित राजकारण बघायला मिळतेय.सध्याच्या राजकारणात जे काही चाललय ते जनतेच्या हिताचं नसुन स्वहिताच आहे.राजकारणात येण्याधी काहीच नसताना सत्ता मिळाल्यावर सत्तेचा दुरूपयोग करून कोट्यावधी संपत्तीचे मालक होतात.भलेमोठे भुखंड,व अब्जावधीची संपत्ती गोळा करून एशोआरामाचे जीवन जगतात त्यात राजकारणात सर्वच कुटुंबीयांचा सहभाग असल्यानंतर संपत्तीची मोजदाद करायला नाकीनऊ येते हे आपण बघत आहोत हे सर्व जनतेच्या जीवावर चाललय.आणि आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय याच आश्चर्य वाटंत.देशाची भलेही प्रगती झाली असेल विकास झाला असेल.औद्योगिक वसाहतीत वाढ झाली असेल.पण माझा भारत देश सुजलाम सुफलाम अजून व्हायच राहीला आहे.गरीब,महागाई,
बेरोजगारी,अन्याय, अत्याचार मुक्त व्हायचा बाकी आहे,शेतकरी आत्महत्या मुक्त भारत देश व्हायचा राहीला आहे.
भारत देश हा कृषीप्रधान देश म्हटला जातो.पण शेतकऱ्यांच्या हिताचा विचार कुठे होतो?कर्ज घेवून शेती करणाऱ्या शेतकर्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही.कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसामुळे पिकांची नासधूस होते,नुकसान होते तोंडी आलेला घासही पोटात जातं नाही. सावरकरी कर्जांच्या जाळ्यात अडकूनही त्या शेतकऱ्यांना सुखासुखी जगता येत नाही उपासमारीची वेळ येते आणि मग सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते.यावर ठोस उपाययोजना शासनाकडून आजतागायत झालेली नाही.ज्या शेतऱ्यांच्या जीवावर या देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत आहे त्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या पिकांना त्यांच्या मनासारखा भाव मिळत नाही.जर शेतकऱ्यांच्या पिंकाना हमीभाव देवून त्यांच्याही वाटेला श्रीमंत होण्याच भाग्य लाभले तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.पण मनासारखे खाते मिळाले नाही म्हणून त्यांची मनधरणी करण्यात सध्याच्या राजकीय नेत्यांची पळापळी चाललीय आहे तेंव्हा शेतकऱ्यांच काय घेवून बसलात.
देशासाठी शहिद होणाऱ्या सैनिकांचीसुध्दा अशीच अवस्था आहे. आपले आईवडील बायका पोरं घरदार कुटुंब गावं सोडून देशाच्या रक्षणासाठी विरजवान सिमेवर तैनात आहे. ऊन,वारा,थंडी,पाऊस कसलाच विचार न करता भुक तहान विसरून अर्धपोटी राहून आपल्या देशाच रक्षण करतं आहेत पण त्यांच्या पश्चात त्या़च्या घरी दिवाळीही साजरी होत नाही.गोडधोड खाण्याधी आपला मुलगा काय खात असेल याचा विचार करून मुलाच्या आठवणीत जगारे कुटुंबीय आपल्या लेकराच्या सुरक्षिततेची प्रार्थान करतात.जर एखादा सैनिक शहीद झाला तर शासकिय इतमामात त्याची अंतिम अंत्ययात्रा काठून त्याला अलविदा केले जाते पण त्याच्या नंतर त्याच्या कुटुंबायाची होणारी वाताहतीकडे एकाही स्थानिक व वरिष्ठ राजकीय नेत्यांचे लक्ष नसते.जाहीर केलेली शासकीय मदतीसाठी त्यांना वर्षानुवर्षे पायपीट करावी लागते.जो देशाचे रक्षण करतो त्याच्या परिवाराचे असे हालअपेष्टा व्हावेत याचा राजकीय नेत्यांनी,मंत्रानी गांभीर्याने विचार करायला हवा.या अमृत महोत्सवा निमित्ताने प्रत्येक सिमेवर लढणाऱ्या प्रत्येक सैनिकांच्या कुटुंबियांचा स्वातंत्र दिनाच्या शुभदिनी आदरपूर्वक शासकीय सन्मानाने गौरविण्यात आले असते तर खऱ्यार्थाने अमृत महोत्सव सार्थकी झाला असता.पण असे झाले नाही हे भारताचे दुर्भाग्य समजावे.
आज अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत गृहउद्योग पासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रीच्या मालक होण्यात त्यांचा पुढाकार आहे.बरेच पुरूष,महिला सामाजिक संस्था चालवतात त्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबवतात पिडीतांच्या समस्या असतील गरजवंताच्या अडचणी असतील गोरगरीब झोपडपट्टीतील मुले,भटके अनाथ व देहविक्रयतेची मुले. असतील कचरा वेचणाऱ्या मुलांचे पुनर्वसन असेल आशा मुलामुलींला शिक्षण, रोजगार,उद्योग आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होत असते.कुठलीही आर्थिक मदत नसताना या भारत देशात अनेक एनजीओ आहेत की ते सामाजिक कार्य करून देश हिताचा विचार करताय.पण त्यांना शासकीय योजनेचा लाभ होत नाही,होत असेल तरी त्यासाठी त्यांना पायपीटच करावी लागते.
महिला अत्याचाराचाही प्रश्न गंभीर आहे.याचा विचार सध्याच्या नेत्यांनी करायला पाहिजे.कारण जी जनता सत्तेवर बसवू शकते तिच जनता भिकेलाही लावू शकते,ओढाताणीचं उठावाचं राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे दिवस गेलेत आता जनता हुशार झाली आहे त्यांना आता राजकारण चांगलच कळतय तेव्हा जनतेच्या हिताचा विचार करून देशाचा विकास करावा.
म्हणजे या देशाने अभिमान वाटावा अशी प्रगती जरी केली असेल तरी देशाच्या काही अतिदुर्गमभागात कुठल्याच सुखसुविधा आजपर्यंत पोहचल्या नाहीत किंवा कुठलाच विकास झाला नाही. ईतकच काय तर चालायला रस्ता नाही, पुल नाही,लाईट,पाणी रोजगार,वाहतूकची सोय नाही.कुठलीच वैद्यकीय सेवा नाही.आजही या देशात असे लोक आहेत की त्यांना दोनवेळेचे अन्न मिळत नाही, प्रचंड महागाई वाढलेली आहे.कितीतरी शिक्षीत तरूणांना रोजगारासाठी भटकावे लागतं आहेत. खांद्यावर किंवा झोळीकरून मृतदेह नेण्याच वेदनादायक दुर्भाग्य दुर्गमभागातील
लोकांना भोगाव लागत आहे.महिला मुली अन्याय अत्याचाराच्या शिकार होतात.अशा कितीतरी अडचणी किंवा समस्या आहेत की त्याचे निवारण झाले नाही.या सर्व दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी सरकारवर विश्वास ठेवून चालणार नाही.तर त्यासाठी जनतेलाही स्वतःच्या भरवशावर पुर्ण ताकदीने काम करून संकट समस्या.सोडवण्यासाठी जबाबदारीच पाऊल उचलून पुढाकार घ्यावा लागेल तरचं खऱ्यार्थाने
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हटला जाईल व भारतीय नागरीकांना त्याचा आनंद होईल आणि असे झाले तरच आपण गर्वाने म्हणू शकू
*’सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा’*

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा