*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाती!गवताची*
गवताला कधी मानू नये तुच्छ
गवतालाही असतो इतिहास
गतस्मृतीचा गंध जपत जपत
दरवरळतो तृणगंधाचा सुवास
भूक भागवते या जगाची तरीही
या गवताची कुणाला किंमत नाही
खुल्या आभाळाखालची हिरवळ
गालीच्याचा मान कुणी देत नाही
तृणपात्यांची ही असते बखर
त्या पात्यांच्या अंगावर घडला इतिहास
पायदळी तुडवली जाणारी हरळीच ती
त्या हिरवळीचा असे आगळा मिजास
भगवंताच्या चरणी विसावली की दुर्वा
तीर्थस्थळी पडली!अस्तित्वाच सोन होत
हरळी मनात दाटून आली की हिरवळ
बांधावर उगवली की तिचं तण होत
जिंकाया या जगाचे स्वामित्व ईश्वरी
पाती गवताची अंगावर वार झेलतात
निरंकारी निर्मोही गवताच्या पात्याशी
आपल जन्मभराच नात जोडून घेतात
बाबा ठाकूर