You are currently viewing करुळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यंत बंद

करुळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यंत बंद

जड-अवजड वाहतुकीसाठी निर्णय

 

सिंधुदुर्गनगरी :

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी वरील गगनबावडा घाटात संरक्षण भिंत दरीत कोसळून सदर रस्ता जड व अवजड वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे. त्यामुळे सदर रस्ता २५ ऑगस्ट पर्यंत जड व अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी काढली आहे.

गगनबावडा घाटातील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम विना अडथळा पूर्ण होण्यासाठी मौजे एडगाव (एडगाव तिठा) ते करूळ घाट, गगनबावडा हद्दीपर्यंत जड व अवजड वाहनांची २५ ऑगस्ट पर्यंत बंद करून कोल्हापूरहून येणारी अवजड वाहने खंडासरी (क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडाघाटमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी कडे तसेच गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्यावरून फोंडाघाटातून कोल्हापूरकडे या पर्यायी मार्गाने मार्गस्थ होतील. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ व गृह विभागाकडील अधिसूचना क्र. एमव्हीए ०५८९ /सीआर १०६१ डिआरए २ दि. १९ मे १९९० नुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हे आदेश दिले गेले आहेत. वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हे लोकांना समजेल, अशा भाषेत लावण्याची कार्यवाही करावी, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा