You are currently viewing आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही पोरांचा हट्ट!!

आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही पोरांचा हट्ट!!

भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून डागली तोफ

आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याच्या ठाकरे सरकारच्या अट्टाहासापोटी राज्याचे, पर्यायाने जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. आता या निर्णयावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच टार्गेट होताना दिसत आहेत. भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनीही ट्विटरवरून या निर्णयामागे केवळ मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही पोरांचा हट्ट असल्याचे सांगत ठाकरे सरकारची चांगलीच गोची केली आहे.

ट्विटरवर श्री निलेश राणे यांनी म्हंटले आहे की “आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट! करोडो रुपये वाया जाणार. नवीन परवानग्या केव्हा मिळतील, आणि मिळतील की नाही हे माहीत नाही. कारण ती जमीन खारफुटीसारखी भुसभुशीत आहे. आता किमान पाच हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागतील. आधीचे पैसे गेले!”

आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासी निर्णयामुळे महाराष्ट्राला सुमारे १७०० कोटी रुपयांचा चुना लागला आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांनी १३ मार्च २०१२ रोजी आरे कारशेडबाबत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. पण गतीने निर्णय घेण्यात आले नाही.

हा निर्णय घेताना या जागेचा काही व्यावसायिक वापर सुद्धा होणार होता. पण तत्कालिन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या ३० हेक्टर जागेचा वापर पुढीलप्रमाणे ठरविला. डेपो परिसर : २१ हेक्टर, अप्रोच लाईन्स आणि डेपो स्टेशनसाठी ४ हेक्टर, ग्रीनपॅच : ५ हेक्टर (एकूण ३० हेक्टर)

या ३० हेक्टर जागेत ५ हेक्टर हा ग्रीनपॅच असल्याने त्याला कुठलीही बाधा न येता तो ग्रीनपॅच तसाच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रत्यक्ष कारडेपोसाठी वापरण्यात येणारी जागा ही २५ हेक्टर इतकीच राहणार होती.

मुंबई मेट्रो-3 हा ३३.५ कि.मी चा मार्ग आहे. त्यावर सुरूवातीच्या काळात आठ डब्याच्या ३५ आणि नंतरच्या काळात आठ डब्याच्या ५५ मेट्रो धावणार असल्याने या ३० हेक्टर जागेची आवश्यकता होती.

आरे कारशेडचीच जागा योग्य ठरेल असे अनेक अहवाल तयार झाले. असे करताना इतर सर्व जागांबाबत विचार झाला होता. हरित लवाद, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सर्वांनी आरेची जागा योग्य असण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च येथील कामावर झाला.

आरेच्या कामाला स्थगितीमुळे दररोज सुमारे ५ कोटींचे नुकसान झाले. महिन्याला १५० कोटी प्रमाणे गेल्या ९ महिन्यात १२०० ते १३०० कोटी, शिवाय पूर्ण झालेल्या कामाचे ४०० कोटी, असा १७०० कोटींचा चुना आज उद्धव ठाकरे यांच्या हट्टापायी महाराष्ट्राच्या जनतेला लागला आहे. . गेल्या पाच वर्षात अतिशय गतीने अनेक प्रकल्प पुढे गेले होते. मात्र आता रखडत चाललेल्या विकास प्रकल्पांमुळे आज राज्याचा गाडा अधोगतीच्या मार्गावर वाटचाल करू लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा