जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना
कंसाच्या त्रासाने, व्याकुळले चराचर।
भगवंताने वाचनासाठी, घेतला अवतार।।
एक आंनद घनश्याम, निर्गुण निराकार।
रक्षण करण्यासाठी, मग झाले साकार।।
निर्माता पालनकर्ता, तुला काय कुणाची भीती।
रोहिणी नक्षत्र अष्टमी, आला काळ्या राती।।
बंदिगृहामध्ये जन्माला, देवकीच्या उदरी।
गोकुळात येऊन, सुख यशोदेच्या पदरी।।
वेड लावले गोपिकांना, वाजवून तू मुरली।
राधा झाली प्रियसी, कृष्णा मध्ये विरली।।
बातमी कळली मामाला, तिकडे हाहाकार।
इकडे तारणहार आला, म्हणून जयजयकार।।
धर्म रक्षण्यासाठी, सारथी सुद्धा झाले।
रणांगणी पार्थाला, गीता ज्ञान दिले।।
घाला देवा पदरी, होईल जो जो गुन्हा।
श्रीकृष्ण गोविंदाला, वंदन पुन्हा पुन्हा।।
रामदास आण्णा
गाव:मासरूळ, ता.जि. बुलढाणा