You are currently viewing राज्यात आज सकाळी 11 वाजता स्वराज्य महोत्सवांतर्गत राष्ट्रगीताचे समूहगान

राज्यात आज सकाळी 11 वाजता स्वराज्य महोत्सवांतर्गत राष्ट्रगीताचे समूहगान

मुंबई :

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत आज बुधवारी सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

राज्यातील खाजगी, शासकीय आणि इतर सर्व प्रकारच्या शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यामधील विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग असेल. सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल आणि सकाळी 11 ते 11.01 मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अनिवार्य असेल. समूह राष्ट्रगीताच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक असून याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळय़ा माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. राज्यातील अंगणवाडय़ा, सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची विद्यापीठे, खाजगी- शासकीय सर्व शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थी, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हाव़े नागरिकांनी असतील त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून उभे राहून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा