*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठान लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*
🌹🇮🇳🌹🙏🏻🌹🇮🇳🌹
*उठा हर्षोल्हास करा*
मुक्ती मिळाली ज्या दिनी झाले पारतंत्र्य नष्ट,
उठा हर्षोल्हास करा आला पंधरा ऑगष्ट…।।
होती पायात साखळी पारतंत्र्याची घातली,
भुते ब्रिटिशांची कशी मदोन्मत्त नि मातली,
त्रास किती दिला आम्हा किती लादियले कष्ट..।। १।।
होती घरात मुस्कटदाबी आमची चालली,
स्वातंत्र्याच्या उन्मादाने सारीच जनता हालली,
स्वातंत्र्याचे पुसटशे चित्र तधी झाले स्पष्ट..।। २ ।।
पारतंत्र्याचा चिखल सारे कपडे माखले,
धुवू मुक्तीच्या पाण्याने मनात होते आखले,
साथ एकतेने केली पळून गेले ते भ्रष्ट..।। ३ ।।
आज घ्यायची शपथ दूर करू सारे रोग,
घ्यायचा आहे आम्हाला मुक्तीचा सदुपयोग,
अंतरातला आनंद कृतीतून करूया स्पष्ट..।। ४ ।।
लोकशाही भारतात आता लागली डुलू,
बहरून गेली बाग दिसू लागली फुलू,
आनंदावे परी इतक्याने होवू नका संतुष्ट..।। ५ ।।
बघता बघता होवू आपण जगतगुरु,
संकटांना तोंड देवू मातीत तयांना पुरू,
म्हणतील सारे भारताला जगामध्ये उत्कृष्ट..।। ६ ।।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*