देवगड :
देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वे येथील पूर्ण प्राथमिक शाळा येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत मोर्वे गावातील ग्रामस्थ माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्वे शाळेचे शतक महोत्सवी वर्ष सुरू असून विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविले जात आहेत.
स्वातंत्र्यदिना निमित्त ओवळेश्वर मंदिर येथून शाळेपर्यंत गावातून ढोल पथकासह भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा या वेळी देण्यात आल्या. यादरम्यान शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. यावेळी मोर्वे ग्रामस्थ माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते श्री. सत्यवान कांदळगावकर यांनी मुलांना वह्या व खाऊचे वाटप केले. श्री.सुबोध ढोके यांनी मुलांना शालोपयोगी साहित्याचे वाटप केले. श्री.निखील तारी यांनी सजावट साहित्य दिले. श्री.विनोद कांदळगावकर व श्री गुरूनाथ कांदळगावकर यांनी समुहगीतांना संगीत साथ दिली. श्री.प्रसाद ढोके यांनी छायाचित्रण तर श्री.दिनेश कोले यांनी साऊंड सिस्टीम व्यवस्था केली.
शतक महोत्सव समिती अध्यक्ष श्री.प्रकाश तळवडकर, सीआरपीएफ इन्स्पेक्टर रामदास कुमठेकर, श्री. गंगाराम मोर्वेकर, श्री.छगन बापर्डेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अरविंद सारंग, उपाध्यक्षा कीर्ती गावकर, ग्रामपंचायत हिंदळे यांनी मुलांना खाऊचे वाटप केले. श्री.दत्ताञय सारंग यांनी शतकमहोत्सवासाठी 5000/- देणगी दिली. श्री.अरविंद मोर्वेकर, ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री.कंकाद्रिक लोणे श्री.श्रीकृष्ण कोळंबकर कु.योगेश्वरी बापर्डेकर, कु.दिप्ती जोशी,कु.निखील कोळंबकर, कु.अनन्या गावकर, कु.यश्वी कांदळगावकर, कु.निकिता बापर्डेकर व शालेय विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळेचा शतक महोत्सव वर्ष साजरे करत असताना लोकसहभागातून ग्रामस्थांच्या निधीतून हॉल, स्टेज, विहीर, कंपाउंड वॉल, आणि शालेय परिसर सुशोभीकरण आदी कामे हाती घेऊन पूर्ण करायचा मानस आहेे. जेणेकरून या शंभर वर्षांच्या आठवणी पुढील शंभर वर्ष कायम राहतील, असा मानस आहे. अश्या प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद सारंग यांनी या दरम्यान व्यक्त केल्या आहेत. श्री.सचिन तवटे सर व श्री.प्रविण सावरे सर यांनी कार्यक्रमाचे सूञसंचालन केले.