You are currently viewing माजी आमदार श्री. शंकरभाई कांबळी वाढदिवस अभिष्टचिंतन…

माजी आमदार श्री. शंकरभाई कांबळी वाढदिवस अभिष्टचिंतन…

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार श्री.शंकरभाई कांबळी यांचा आज वाढदिवस… सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना जोमाने वाढली आणि ती वाढविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्यापैकीच एक म्हणजे कुडाळ वेंगुर्ला मतदार संघात तीन वेळा निवडून येत शिवसेनेची ताकद दाखविली होती ते माजी आमदार श्री शंकरभाई कांबळी…! मूळ शिरोडा येथील रहिवासी असलेले शंकर भाई कांबळी यांची संपूर्ण हयात मुंबई येथे गेली होती. मुंबईत शिवसेनेचे प्राबल्य मोठ्या प्रमाणावर असतानाच शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणाकडे आपले लक्ष केंद्रित केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे, शंकर कांबळी, शिवराम दळवी यांच्यासारख्या नेत्यांनी मुंबईतून येऊन आपले नशीब आजमावले. ज्या प्रमुख नेत्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला गावागावात पोचवले त्यामध्ये आदराने घ्यावे असे नाव आहे ते माजी आमदार श्री शंकरभाई कांबळी यांचे…!

     सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस आणि जनता दलाचे वर्चस्व होते, परंतु काँग्रेस आणि जनता दलाचे वर्चस्व मोडीत काढीत कुडाळ वेंगुर्ला मतदार संघाचे आमदार माजी आमदार श्री शंकरभाई कांबळी यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून येत शिवसेना कुडाळ वेंगुर्ला मतदार संघात रुजविण्याचे मोठे काम केले. श्री शंकर भाई कांबळी यांनीवएकदा आमदार झाल्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. तब्बल तीन वेळा कुडाळ वेंगुर्ला मतदार संघातून निवडून येत त्यांनी हॅट्रिक नोंदवली होती. आपला दांडगा जनसंपर्क आणि वेंगुर्ला इत्यादी तालुक्यात असलेले भंडारी समाजाचे प्राबल्य असल्याने व श्री.शंकरभाई कांबळी भंडारी समाजाचे असल्याने त्यांना निवडून येण्यास भंडारी समाजाचीही मदत मिळत गेली.

    मतदार संघातील बदलांमुळे पुढे कुडाळ वेंगुर्ला मतदार संघ विभागला जाऊन वेंगुर्ला तालुका सावंतवाडी मतदारसंघाला जोडला गेला, आणि प्रकृतीच्या कारणांमुळे माजी आमदार शंकर भाई कांबळी यांनी काही काळ राजकारणापासून दूर राहणे पसंत केले. परंतु वेंगुर्ला तालुक्यातील त्यांची ताकद आजही तेवढीच असून गोरगरिबांसाठी झटणारे, मदतीला धावून जाणारे आणि कोणाच्याही हाकेला उभे राहणारे श्री.शंकरभाई कांबळी यांनी लोकांच्या मनावर आपले नाव करून ठेवले आहे. समाजामध्ये एक सज्जन, माजी आमदार, लोकनेता म्हणून त्यांची प्रतिमा आजही अढळ आहे. वेंगुर्ला तालुक्यातील अनेक लोक आजही त्यांच्यावर तेवढेच प्रेम करत आहेत.

     गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात शिवसेनेत मध्ये फूट पडून 40 आमदारांनी उठाव केला आणि वेगळा गट स्थापन केला त्यावेळी हाडाचे जुने शिवसैनिक असणारे श्री शंकर भाई कांबळी यांना ते सहन झाले नाही. तेव्हा पुन्हा एकदा पेटून उठत ते मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे अशा या हरहुन्नरी, हिंदुहृदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे हाडाचे शिवसैनिक, माजी आमदार श्री.शंकरभाई कांबळी यांचा आज वाढदिवस *संवाद मीडियाकडून माजी आमदार श्री.शंकरभाई कांबळी यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*

प्रतिक्रिया व्यक्त करा