परुळे :
स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सव निमित्ताने परुळेबाजर ग्रामपंचायतीतर्फे स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.
ग्रामपंचायत परूळेबाजारचे 14 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण माजी स्वातंत्र्यसैनिक कै. परशुराम राजाराम नेवाळकर यांच्या पत्नी श्रीम. सुहासिनी परशुराम नेवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच मनीषा नेवाळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, विजय घोलेकर, शांताराम पेडणेकर, ग्रामपंचायत कर्मचारी व शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, तलाठी मिलिंद कुडतरकर, डाटा ऑपरेटर अश्विनी चव्हाण, आरती परुळेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा 75 व्या वर्ष अमृतमहोत्सव म्हणून साजरे करीत असताना ग्रामपंचातीतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच निमित्ताने ध्वजारोहणाचा मान स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला देण्यात आला.