– डॉ संजय देशमुख -माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत शिवरामराजे भोंसले तथा राजेसाहेब यांची ९५ वी जयंती ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले तर प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ संजय देशमुख हे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई व सहसंचालक अ ॅड श्यामराव सावंत ,संस्थेचे सदस्य डॉ सतीश सावंत श्री जयप्रकाश सावंत हे उपस्थित होते . प्रमुख उपस्थितांमध्ये श्री वसंत केसरकर, प्रा. अन्वर खान , डॉ राजेश गुप्ता ,श्री अच्युत सावंत भोसले , श्री सुरेश गवस , भगवान देसाई, श्री प्रवीण देसाई ,श्री पी पी देसाई ,काका मांजरेकर ,श्री प्रेमानंद देसाई डेगवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल ,श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या अॅडव्होकेट अश्विनी लेले , मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अनुजा साळगावकर , अॅडव्होकेट अश्विनी लेले कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले . प्रास्ताविक डॉ डी एल भारमल यांनी केले . प्रमुख अतीथींचा परिचय प्रा.सौ.प्रगती नाईक यांनी करुन दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ संजय देशमुख यांनी ‘ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नीती आढावा व भविष्याचा वेध’ या विषयावर आपले विचार मांडले .ते म्हणाले देशात 1968 ला पहिले शैक्षणिक धोरण राबविण्यात आले त्यानंतर 1986 ला दुसरे शैक्षणिक धोरण राबविण्यात आले. आता तब्बल 34 वर्षांनंतर 2020 मध्ये नवीन शैक्षणिक आणले आहे. नवे शैक्षणिक धोरण निश्चितपणे विद्यार्थ्यांसाठी फलदायी आहे. आता विद्यार्थ्यांना आपल्या मनासारखे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे .असे प्रतिपादन त्यांनी केले .
नविन शैक्षणिक धोरणामध्ये शहरी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे संशोधन अभ्यासासाठी येणार आहेत. त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत लाल मातीतील शिक्षण घेतलेले विद्यार्थी अग्रेसर ठरणार आहेत . तसेच एकाचवेळी दोन शाखांमधून ते पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकणार आहेत. आता ऑनलाइन शिक्षण पद्धतीला महत्त्व येणार आहे असेही डॉक्टर देशमुख यांनी सांगितले .
डॉक्टर देशमुख पुढे म्हणाले की नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा तिन्ही शाखा निवडण्याची गरज नसून एकत्रितपणे तिन्ही शाखांचा अभ्यास करता येणार आहे आता ऑनलाइन शिक्षण प्रणाली अवलंबणे आवश्यक आहे .विद्यार्थी आता घरबसल्या विविध शाखांचा अभ्यास करू शकणार आहेत .विद्यार्थी व शिक्षकांनी या बदललेल्या शिक्षण पध्दतीमध्ये स्वतःमध्ये बदल करायला हवे.
पाठांतर ही पूर्वीची शिक्षण प्रणाली आता बदलली आहे. त्यामुळे 2030 मध्ये स्किल डेव्हलपमेंटला महत्त्व येणार आहे शिक्षक प्राध्यापक अशा नोकरीच्या पद्धतीत बदल होणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाचा फायदा निश्चितच होणार आहे त्याची अंमलबजावणी कोणत्या पध्दतीने होणार यावर धोरण अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
श्री वसंत तथा अण्णा केसरकर यांनी राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांच्या आठवणी सांगितल्या .शिवरामराजे भोंसले हे रयतेचे राजे होते ते25 वर्षे आमदार होते. त्यांनी सर्वसामान्य गरीब जनतेसाठी , शेतकऱ्यांसाठी फार मोठे काम केले. त्यांनी 1961 मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना केली त्यामुळे येथील गोर गरीब जनता उच्च शिक्षण घेऊ शकली .
प्रा. अन्वर खान म्हणाले त्या काळात पॅलेस हाॅस्टेल राजवाड्यात सुरू केले होते त्यामध्ये आपल्याला शिक्षण घेता आले त्यामुळे सावंतवाडी संस्थानचे उपकार आपल्यावर आहेत असे स्पष्ट केले .अध्यक्षीय मनोगतामध्ये श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी संस्थापक दिनानिमित्त आलेल्या संस्थान प्रेमी जनतेला धन्यवाद दिले व नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वत मध्ये बदल करावा असे सांगितले .सूत्रसंचालन प्रा सौ प्रगती नाईक यांनी केले तर आभार सौ कविता तळेकर यांनी मानले.