*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम गझल रचना*
*आनंदकंद*
*शीर्षक :- तिरंगा*
*स्वातंत्र्य देउनी हा, फडके असा तिरंगा*
*ह्रुदयात भारताच्या, झळके असा तिरंगा*
*भाषा नि धर्म, जाती, असती इथे निराळ्या*
*एकीत या दिसे हा, हटके असा तिरंगा*
*देशाभिमान वाढे, खेळांत भारताचा*
*पदकांत जिंकलेल्या, चमके असा तिरंगा*
*देशात रक्षणाच्या, नाही कसूर केव्हा*
*शौर्यात सैनिकांच्या, धडके असा तिरंगा*
*पडता नजर कुणाची, स्वातंत्र्यदेवतेवर*
*गुंडाळुनी कफन हा,भडके असा तिरंगा*
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.