You are currently viewing उमेद फौंडेशनच्या शिष्यवृत्ती साठी 15 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

उमेद फौंडेशनच्या शिष्यवृत्ती साठी 15 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

बांदा

अनाथ, एक पालकत्व, गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी उमेद फौंडेशन शिष्यवृत्ती २०२२साठी अर्ज करायची मुदत १५ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे.
उमेद फौंडेशन शिष्यवृत्ती अर्ज www.umedseva.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.उमेद फौंडेशन ने निश्चल इसरानी फौंडेशन च्या मदतीने हुशार व गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता “उमेद फौंडेशन शिष्यवृत्ती” ही मोहीम राबवण्यात आली आहे.सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या कडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
उमेद फौंडेशन ही संस्था २०१४ पासून अनाथ वंचित गरजू व हुशार विद्यार्थांना शैक्षणिक मदतीसाठी सामाजिक भान जपणाऱ्या दानशूर लोकांच्या मदतीने कार्यरत आहे.आजपर्यंत अनेक विद्यार्थी या मदतीचा लाभ घेत शिक्षण पूर्ण करू शकले आहेत .उमेद शिष्यवृती साठी उमेदीयन श्री.सागर पेंडूरकर सर9657162545 यांच्याशी संपर्क साधावा असे उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा