You are currently viewing करिअर कट्टा प्रमुख मा. यशवंत शितोळे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा संपन्न

करिअर कट्टा प्रमुख मा. यशवंत शितोळे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा संपन्न

वैभववाडी

दिनांक १२ ऑगस्ट,२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा संपन्न झाला. सुरुवातीला सकाळी कला व विज्ञान महाविद्यालय फोंडा या ठिकाणी शितोळे सरांचे व्याख्यान संपन्न झाले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी समुदायाला त्यांनी करिअर कट्टा विभागाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली व करिअर कट्टा कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सतिश कामत सर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फूलझेले उपस्थित होते. त्यानंतर आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी हे शितोळे सरांचे व्याख्यानाचे दुसरे महाविद्यालय होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मोठ्या समुदायाला मा. शितोळे सरांनी संबोधित केले. करिअर कट्टा विभागाअंतर्गत येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उद्योजकता विकास व कौशल्यावर आधारित वेगवेगळी कोर्सेस यांची माहिती दिली. सरांच्या वक्तृत्व शैलीने विद्यार्थी अगदी मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी करिअर कट्टा विभागाचे सर्व महाविद्यालयीन समन्वयक, इतर प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी एस काकडे यांनी भूषविले. त्यानंतर कणकवली महाविद्यालय कणकवली या ठिकाणी शितोळे सरांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्टा विभागाची संपूर्ण माहिती दिली व करिअर कट्टा विभागामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कणकवली महाविद्यालय कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व करिअर कट्टा विभाग समन्वयकांची कार्यशाळा संपन्न झाली. या करिअर कट्टा कार्यशाळेमध्ये माननीय यशवंत शितोळे सर यांनी सर्व समन्वयकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये करिअर कट्टा विभागाशी संबंधित काही ठराव सहमत करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. चौगुले सर यांनी अध्यक्षस्थान भूषवले व त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तक पदावर आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी चे प्राचार्य डॉ. सी एस काकडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. सी एस काकडे यांनी करिअर कट्टा हा महाविद्यालयातील एक उत्कृष्ट उपक्रम असून त्याचा नॅक मूल्यांकनाच्या दृष्टीने प्रत्येक महाविद्यालयाला अतिशय फायदा होणार आहे, असे आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये सांगितले. या कार्यशाळेचे उत्कृष्ट असे नियोजन कणकवली तालुका करियर कट्टा समन्वयक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले. कार्यशाळेसाठी करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे, वेंगुर्ला दोडामार्ग व बांधा तालुका समन्वयक डॉ. रामाकांत गावडे, देवगड तालुका समन्वयक प्रा. तेवूरकर सर, वैभववाडी तालुका समन्वयक प्रा. गंगाधर हनवते व जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयीन समन्वयक उपस्थित होते.
शितोळे सरांच्या जिल्हा दौऱ्यामुळे करिअर कट्टा विभाग प्रत्येक महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितपणे एक सकारात्मक वातावरण निर्मिती झाली. या जिल्हा दौऱ्यामुळे प्रत्येक महाविद्यालयीन समन्वयकामध्ये करिअर कट्टा विषयक जाणीव व जागृती निर्माण झाली. पुढील काळामध्ये करियर कट्टा विभागाचे काम प्रत्येक विभागांमध्ये व महाविद्यालयांमध्ये जोमाने सुरू होईल जास्तीत जास्त विद्यार्थी करिअर कट्टा विभागाचा लाभ घेतील स्पर्धा परीक्षा विषय उपक्रमामध्ये विद्यार्थी सहभागी होतील. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विषयक कौशल्य आत्मसात होतील, आणि करिअर कट्टा विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अनेक कौशल्य आधारित कोर्सचा विद्यार्थी उपयोग करून घेतील अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा