सिंधुदुर्गनगरी
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनामित्त सोमवार दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.05 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालय येथील पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 9.05 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ कार्यक्रम होईल. तसेच सकाळी 9.5 ते 9.15 वाजता पोलीस दल, राज्य राखीव दल व होमगार्ड, यांची संयुक्त मानवंदना होईल.
मुख्य शासकीय समारंभाच्या ठिकाणी सकाळी 8.45 वाजेपर्यंत स्थानापन्न व्हावे. समारंभाला राष्ट्रीय पोषाखात यावे. मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.05 वाजता असल्यामुळे इतर कार्यालये अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 8.35 च्या पुर्वी किंवा सकाळी 9.35च्या नंतर करावा. जिल्ह्यावासीयांनी ध्वजारोहण समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.