कुडाळ
सध्या कोरोनाने संपुर्ण जग हादरले असून हा विषाणू संपता संपत नाही आहे आजच्या स्तिथीत या रोगाची ही दुसरी साखळी सुरू असून गणपती नंतरच्या कालखंडात याचे रुग्ण जिल्हात वाढत चालले आहे जिल्ह्यातील अनेक संस्था , संघटना, वेगवेगळ्या माध्यमातून या संक्रमणला रोखण्याचे प्रयत्नकरत असून काही प्रमाणात त्यांना यशही मिळत असल्याचे आपल्याला दिसत आहे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक स्थानीक कलाकारांनी ही आपल्या कलेच्या माध्यमातून ही जनजागृती केली असून पिंगुळी येथील दयाती लोककला संवर्धन अकादमी व ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम च्या कलाकारांनी मागच्या वेळेला कळसूत्री बाहुल्यांचा माध्यमातून अनेक व्हिडिओ बनवत जनजागृती करण्याचे कार्य केले होते.
या वेळी मात्र शिवदास मसगे व बाळकृष्ण मसगे या ठाकर आदीवासी कलाकारांनी चित्रकथीत या कलेची मदत घेत चित्रकथीत या दुर्मीळ होत चाललेल्या आदिवासी कलाप्रकारातून चित्रे रेखाटत जनजागृती संदेश दिला आहे. या चित्रांमधून सुरक्षित अंतर ठेवा हस्तांदोलन टाळा, घरी राहा, सुरक्षित राहा, व्यवसाय महत्त्वचा जीवन त्यापेक्षा महत्वाचे अशा प्रकारचे संदेश दिले असून हे संदेश पूर्ण फलक त्यांनी सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केले आहे अश्या प्रकारच्या आदिवासी कलेच्या माध्यमातून हे कलाकार नवनवीन प्रयोग करत आहेत.
चित्रकथीत हा कलेचा प्रकार राष्ट्रीय स्तरावर खूप प्रसिद्ध असून त्याचे संवर्धन करण्याचे कार्य गणपत मसगे व त्याचे दोन्ही सुपूत्र करत आहेत. याच्या जवळ 400 ते 500 वर्षापूर्वीची चित्रकथी चित्रे उपलब्ध असून त्यांनी या कलांचे ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम या नावाचे कला मुझियम सुरू केले आहे. याच्या माध्यमातून या आदिवासी कला जगासमोर आणण्याचे कार्य ते करत आहेत.
एरवी देवळा देवळा मध्ये सादर होणारी ही दुर्लक्षीय कला एक नव्या रूपाने समाज प्रबोधन करत आहे.