वेंगुर्ला (शिरोडा) :
सिंधुदुर्गात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी अतिशय नियोजनपूर्वक शहरासह ग्रामपंचायत स्तरावरही नव्या पिढीला क्रांतिवीरांच्या आठवणींना उजाळा दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचा देशाचे स्वातंत्र्य चळवळीत सिंहाचा वाटा आहे. येथे महात्मा गांधी स्मारक व्हावं, अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांनी ऐतिहासिक मीठाचा सत्याग्रह केला तिथे पदयात्रा व भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री देवी माऊली मंदिर येथे भारतमाता प्रतिमेचे पूजन करून स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा व चळवळीचा प्रसंग सादर करणाऱ्या चित्ररथा सह मिठाचा सत्याग्रह गांधीनगर पर्यन्त पदयात्रा काढण्यात आली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सत्याग्रहात सहभागी शिरोडा गावातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांचा तसेच माजी सैनिक कुटुंबांचा सत्कार व देशसेवेवर आधारित पथनाट्यय, देशभक्तीपर गीत, नृत्य व लघुपट सादर करण्यात आलेे. यावेळी प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांचे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर आधारित वाळूशिल्प साकारण्यात आले.
सर्वांच्या मनात देशभक्ती निर्माण झाली पाहिजे. शिरोड्यात महात्मा गांधी स्मारकासाठी बारा वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. आम्ही सुद्धा याबाबतीत एक पाऊल पुढे टाकून विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.
याचा पाठपुरावा प्रशासन करत आहे त्यामुळे लवकरात लवकर महात्मा गांधी यांचे स्मारक उभे करू अशी ग्वाही जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तनपुरे, राजेंद्र पराडकर, विनायक ठाकूर, तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, जि. प. माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, आरवली सरपंच तातोबा कुडव, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, सदस्य कौशिक परब, विस्तार अधिकारी श्री धुरी, श्री. गोसावी, पं. स. माजी उपसभापती सिद्धेश परब, जयप्रकाश चमणकर, भाई मंत्री, ग्रामपंचायत सदस्य रवी पेडणेकर, दिलीप गावडे, वेदिक शेट्ये, स्वरूपा गावडे, विशाखा परब, रोहिणी खोबरेकर, ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण, माजी सरपंच शुभांगी कासकर, राजन गावडे, विजय पडवळ, शिरोडा व्यापारी संघ अध्यक्ष राजन शिरोडकर, आरवली उपसरपंच रिमा मेस्त्री यांच्या सहित महसूल विभाग, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत शिरोडा अंतर्गत महिला बचतगट, विद्यालये, आरोग्य विभाग कर्मचारी, सामाजिक संस्था, ग्रामस्थ यांचा उस्फुर्त सहभाग होता.