You are currently viewing ग्रामपंचायत परूळे येथे महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन

ग्रामपंचायत परूळे येथे महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन

परुळे :

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त ग्रामपंचायत परूळे बाजार मार्फत व प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे तर्फे महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, विजय गोलेकर, ग्रामसेवक शरद शिंदे, कृषी सहाय्यक सूरज परब, समुदायिक आरोग्य अधिकारी वैष्णवी पाटकर, आरोग्य सेविका आर. आर. पिंगुळकर, अंगणवाडी सेविका ऋतुजा राउळ, तसेच इतर  महिला उपस्थित होत्या. यावेळी महीला साठी प्रथम कृषी विषयक मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य अधिकारी वैष्णवी पाटकर यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. किशोवयीन मुलींना होणारे आजार, महिलांना चाळिशी नंतर आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी, तसेच रक्तदाब महिलांमध्ये उद्भवणारे कर्करोग याविषयी माहिती दिली. तसेच गरजू महिलांना भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा