सावंतवाडी :
सावंतवाडीतील मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली. केंद्र सरकार ने आझादी का अम्रुत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा सर्वत्र साजरा करण्यासंदर्भात नियोजन करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत शहराबरोबर गावागावातही हर घर तिरंगा संदर्भात नियोजन केले जात आहे. असेच नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ने सुदर्शन सभागृह येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेत ग्रामस्थ व महिला मोठ्या सख्येने उपस्थित असल्याने ही सभा कोरम सहित पूर्ण झाली. या सभेत हर घर तिरंगा बाबत नियोजन करण्यात आले. तसेच कोंडूरे गाव हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्याचा ठराव एक मताने घेण्यात आला.
हर घर जल जल जीवन मिशन बाबत ही एक मताने ठराव घेण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांना लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑ.सोसायटी च्या शिरोडा शाखा व्यवस्थापक अनुराधा मसुरकर यांनी बचत ठेवी संदर्भात माहिती दिली. यावेळी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर, ग्रा. प. सदस्य अमोल नाईक, स्नेहल मुळीक, कविता शेगडे, महेश शिरसाट, अर्जुन मुळीक, सानिका शेवडे, मधुकर जाधव, गिरिजा मुळीक, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, कृषी सहाय्यक गवंडे, आरोग्य सेवक चव्हाण, गवंडे आधी उपस्थित होते.