You are currently viewing ताईडी माझी ! येईल ती !

ताईडी माझी ! येईल ती !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ताईडी माझी ! येईल ती !*

 

ताईडी माझी

दूर गावी निघून गेली

स्टेशनावर वाट पहात होतो

गाडी माहेराला नाही थांबली ..!

आजही प्लॅटफॉर्मवर मी

तिची वाट पहात आहे

चुकुन देवाच्या गाडीत चढली

तिच माहेर तर जंक्शन आहे ..!

बाबा येरझारा घालत!वेळ झाली

आई आत बाहेर करत आहे

खेळली,हुंदडली,नाचली!ताईडीचं

ते आंगण वाट पाहत आहे..!

स्टेशन माहेराला लागूनचं

रक्षाबंधनाला येणार होती

हात अजूनही मोकळा ,येईल ती

गाडीची शिट्टी सांगत होती .!

आंगणात डबा डबा खेळायचो

डब्यात लपून बसली असेल ती

शोधता शोधता!प्लॅटफॉर्म रिकामा

शिट्टी आजही सांगते !येईल ती…

आस आहे मनाला

परतून येतील ते क्षण

वाट चुकलेल्या गाडीला

भेटेल माहेरचे स्टेशन….!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा