You are currently viewing वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देवून गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देवून गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

इचलकरंजीत राजे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

 

इचलकरंजी :

 

इचलकरंजी येथे राजे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजूंना जीवनावश्यक साहित्य व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे – पाटील यांचे चिरंजीव वरद याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम अप्पर तहसीलदार शरद पाटील , वाहतूक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ , पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे ,माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

इचलकरंजी शहर परिसरात राजे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांबाबत प्रबोधन करतानाच गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो.याशिवाय पाणपोई , गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप , ध्वज निधी संकलन कार्यासाठी आर्थिक मदत यासह सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.

या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे – पाटील हे गेली काही वर्षे आपला चिरंजीव वरद याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत त्याच खर्चातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील गरीब ,दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक साहित्य व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहेत.यंदाच्या वर्षीही हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.वरद याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील गरीब ,गरजू व दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पावसाच्या संरक्षणासाठी छञीचे वाटप अप्पर तहसीलदार शरद पाटील , वाहतूक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ , पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे ,माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवरांनी राजे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत या कार्याचा इतरांनी आदर्श घेवून कार्यरत रहावे ,असे आवाहन केले.सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे – पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन आपल्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगून हा उपक्रम यापुढील काळात सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांसह उपस्थितांनी वरद पाटील – बुबनाळे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सामाजिक उपक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक ओंकार काकडे, खलिल मोमीन, सामाजिक कार्यकर्ते नितेश पोवार, शिक्षक अनिल रावळ, संस्थेचे उपाध्यक्ष वृषभ कांबळे, गणेश आवळे, मुद्दसर तराळ, धनाजी जाधव, कपिल करवते, भगवान बरगाले, यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा