*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य ज्येष्ठ कवी लेखक गझलकार श्री.अरविंदजी ढवळीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रक्षा बंधन*
मना जिंकण्या उणीव कसली हाव नसे शस्त्राची
कधी गेली सांगुन एकच चिंधी जरतारी वस्त्राची ll आजोड प्रीती जगी बहिणीची छाया भासे मातृसुखाची
त्या गर्भातुन ईश निर्मीतो मूर्त दुजी जणू वात्सल्याची
अंश ईश्वरी तें ही जाणती महती मुक्ताईची ll
खेळ मांडता कृष्ण सख्याने
बोट दाविते जखम हृदयीची
वस्त्र भरजरी तरी फाडूनि
चिंधी बांधते ओढ बहिणीची
लाज राखतो तोच मुरारी द्रौपदिच्या पदराची ll
रक्षा बंधन गांठ व्रताची
जन्म जन्मीच्या संस्कारांची
भाऊ बहिणीच्या कर्तव्याच्या
स्वर्गी गुंफलेल्या धाग्यांची
पुराणातल्या कथा न केवळ शिकवण ही संतांची ll
मना जिंकण्या उणीव कसली हाव नसे शस्त्राची
कधी गेली सांगुन एकच चिंधी जरतारी वस्त्राची ll
अरविंद