*महाराष्ट्र रणरागिणी साहित्य कुंज…जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूह सदस्या सौ.किरण (करामोरे) चौधरी यांना संगीता बढे यांनी वाढदिवसानिमित्ताने दिलेल्या काव्यमय शुभेच्छा*
*मैत्री*
काही नाती जगावेगळी
अपुरेच पडती शब्द
न बघताही मनात जागा
कसे कळे ना,निःशब्द
मैत्रीण ही अशी सदाफुलीसम
भूतकाळ समजून,भविष्यात रमते.
वर्तमानाचा स्वीकार करते.
जिव्हाळ्याने राज्य थाटते
काही नाती ना रक्ताची,ना जन्माची
कर्माने ते ती हृदयी जागा भरते
न पाहताही थेट मनात रुजते
काही ऋणानुबंध असेही असते
हक्काचे स्थान मनी कोपऱ्यात
जणू मांडूनी बसते उपोषण
मैत्री हृदयात राज्य करुनि
प्रफुल्लित करते क्षणोक्षण
मैत्री म्हणजे वृक्ष,वाढणार,
प्रत्येक वळणावर फुलणार
सुख दुःख सारून मागे
हास्यच मुखावर झळकवणार
अतूट राहो ही मैत्री दोघींची
नजर न लागो तिला कोणाची
आभार मनस्वी त्या विधात्याचे
सौख्य जुळवले संगी-किरण चे
*संगीता श्रीकांत बढे*