You are currently viewing प्रणाम क्रांतीविरा

प्रणाम क्रांतीविरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य निवृत्त पोलीस अधिकारी जेष्ठ लेखक कवी वासुदेवराव खोपडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

💐💐💐स्वातंत्र्यास्तव आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूरवीरांस कोटी कोटी प्रणाम 💐💐💐

*प्रणाम क्रांतीविरा*
💐💐💐💐💐

हासत चढले फासावरती
केले स्वातंत्र्यास्तव बलिदान
ह्या मायभूमीच्या शूरवीरांनो
मी गातो तुमचे हो गुणगान !!

तमा नच केली स्वसंसाराची
अर्पिला मायभूमिस्तव प्राण
प्राण आहुती देऊन गड्या रे
वाचविली ह्याच मातीची शान !!

ज्वलंत विचारांची क्रांती होती
कुठे,क्षमा,प्रेम, अहिंसा, शांती
ठोश्याला रे ठोशानेच उत्तर
कुठे झाली रक्तरंजित क्रांती !!

त्वेषाने प्राणपणाने लढले
झेलल्यात छातीवरती गोळ्या
स्वातंत्र्य सूर्य नभी ऊगवला
तुटल्यात पारतंत्र्याच्या बेळया !!

घराघरांतून बंडाचे रे झेंडे
जागली मनामनातून क्रांती
तव रक्ताचे रे पाट वाहिले
वैरी नामोहरम झाला अंती !!

तुझ्याच क्रांतीची फळे चाखूनी
लेकुरे बहू उन्मत्त आज झाली
नमकहरामी,बेईमान,स्वार्थी
भ्रष्टाचारी,घोटाळेबाज झाली !!

ओठांवरती कवण तुझे रे
हृदयात कोरले तवनाम
क्रांतीदिनी आज क्रांतीविरांनो
करतो मी कोटी कोटी प्रणाम !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
अकोला 9923488556
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा