You are currently viewing भारतीय ध्वज संहिता

भारतीय ध्वज संहिता

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

*भारतीय ध्वज संहिता*
*भाग २ कलम १*

जनतेतील कोणत्याही व्यक्ती. खाजगी संघटना. शैक्षणिक संस्था. इत्यादींना ध्वजारोहण करणे. राष्ट्रध्वज लावणे. राष्ट्रध्वजाचा उपयोग वापर कसा करावा यासाठी शासनाने काही कलम कायदे नियमावली जाहीर केली आहे.
कलम एक
बोधचिन्ह व नावे ( अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० आणि राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ आणि या अधिनियमित केलेला इतर कोणताही कायदा यात तरतूद केलेल्या मर्यादा व्यतिरिक्त सर्वसाधारण जनतेलाही कोणत्याही व्यक्ती खाजगी संघटना. शैक्षणिक संस्था इत्यादींना राष्ट्रध्वज वापर व लावण्याबाबत कोणतेही निर्बंध असणार नाहीत अधिनियमाच्या तरतूद विचारात घेता
** बोधचिन्ह व नावे ( अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० चा भंग करून वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही
** कोणत्या व्यक्तीस किंवा वसतुस मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणता येणार नाही
** बोधचिन्ह व नावे ( अनुचित वापरास प्रतिबंध) अधिकार १९५० कलम दोन नुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर
** बोधचिन्ह याचा अर्थ अनुसूची मध्ये विनिर्दिष्ट केलेलें असे कोणतेही बोधचिन्ह. मुद्रा. ध्वज. अधिचिनह. कुलचिनह . चित्र. प्रतिरुपण असा आहे.
** कलम तीन त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असेल तरी केंद्र शासन विहीत करील अशी प्रकरणे व अशी परिस्थिती खेरिज एरव्ही कोणत्याही व्यक्तीला अनुसूची मध्ये विनिर्दिष्ट केलेलें कोणतेही नाव किंवा बोधचिन्ह किंवा त्याची कोणतीही अभासी प्रतिकृती याचा केंद्र शासनाच्या किंवा शासनाने या संबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाराच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणताही व्यापार व्यवसाय अजिविका किंवा पेशा यांच्या प्रयोजनार्थ अथवा कोणत्याही स्वामित्व हक्काच्या शीर्षकात अथवा चिन्हांत किंवा चिनहाकृतीत वापर करता येणार नाही.
** भारताचा राष्ट्रीय ध्वज हा या अधिनियमाच्या अनुसूची मध्ये बोधचिन्ह म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आला आहे.
** राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१
** कलम दोन जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत राष्ट्रीय ध्वज त्याचा कोणताही भाग जाळील छिन्न विच्छिन्न करील. विरूप करील. त्याचे पावित्र्य विटाळीत करील. तो विदृप करील. नष्ट करील. पायाखाली तुडविल. किंवा त्याची बेअदबी करील. ( मग ती तोंडी असो अथवा शाब्दिक असो) त्याला तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्य दंड. किंवा दोन्ही शिक्षा होतील.
** कायदेशीर मार्गाने भारतीय राष्ट्रधवजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने भारतीय राष्ट्रधवजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शवणारे अभिप्राय व्यक्त करण्याने किंवा त्यावर टिका टिप्पणी करण्याने या कलमानुसार कोणताही अपराध घडणार नाही.
** भारतीय राष्ट्रध्वज** या शब्द प्रयोगात कोणत्याही पदार्थांपासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थांवर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्यांच्या कोणत्याही भागांचे अगर भागाचे चित्र. रंगीत चित्र. रेखाटन किंवा छायाचित्र. अथवा अन्य दृश्य प्रतिरुपण अंतर्भूत आहे
** सार्वजनिक ठिकाण** या शब्द प्रयोगाचा अर्थ जनतेने वापरवी हा हेतू असलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल अशी कोणतीही जागा असा आहे. व त्यात कोणत्याही वाहनाचा अंतर्भाव आहे.
** ज्या प्रसंगी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारती वरील ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविता येणार नाही
** खाजगी व्यक्ति अंत्यसंस्कार मध्यें आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही
** ध्वजाचा कोणताही पोशाख किंवा गणवेश म्हणून वापर करता येणार नाही. किंवा त्यांचे हातरूमाल. पायपुसणे.उशा . यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यातवर भरतकाम.करता येणार नाही
** ध्वजावर कोणत्याही प्रकारचीं अक्षरे लिहिता येणार नाहीत
** ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे देण्याचे बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधनं म्हणून वापर करता येणार नाही
** प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यांसारख्या राष्ट्रिय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविणयापूरवी ध्वजाच्या आत फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास कोणतीही हरकत नाही
** एखाद्या पुतळ्याचे अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल अशाप्रकारे लावण्यात यावा आणि त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही
** ध्वजाचा वक्तव्याचा टेबल झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्यांचे व्यासपिठावर आच्छादन करता येणार नाही
** ध्वजाचा जाणिवपूर्वक भूमिशी किंवा जमीनीशी स्पर्श हो‌ऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये
** ध्वज मोटार वाहन. रेल्वेगाडी ‌ जहाज किंवा विमान यांच्या झडपावर. छतावर. बाजूंवर किंवा. पाठीमागच्या बाजूस आचछदता येणार नाही
** ध्वजाचा इमारत आचछदन म्हणून वापर करता येणार नाही
** ध्वजाचा ” केशरी रंग ” खालच्या बाजूला जाणिवपूर्वक ध्वज लावता येणार नाही
** जनतेतील कोणतीही व्यक्ती खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगाच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा ध्वजारोहण करता येईल राष्ट्रध्वज लावता येईल
** ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे
** फाटलेला अथवा चुरघळलेला ध्वज लावता येणार नाही
** ध्वज अन्य कोणत्याही धवजासोबत किंवा धवजासोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये ‌
** या ध्वज संहिता भाग तीन मधील कलम ९ मध्ये अंतर्भूत केलेल्या तरतुदी व्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नयेत
** जेव्हा एखाद्या व्यक्तिच्या व्यासपीठावर ध्वज लावायचा असेल तेव्हा त्या वक्त्यांचे तोंड श्रोतयाकडे असताना त्यांच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात किंवा वकतयाचया पाठिमागे लावताना तो भिंतीवर वक्त्यांचे पाठीमागे वरच्या बाजूला लावावा
** जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आल असेल तेव्हा धवजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा त्यांच्या ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा ( म्हंजे ध्वजा कडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तिच्या डाव्या बाजूस असावा
** राष्ट्रध्वज या संहितेच्या भाग एक मध्ये विहित केलेल्या प्रमाण विनिर्दिष्ट शक्य तेवढ्या प्रमाणात अनुरूप असावा
** राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये तसेच ज्या काठीवर ध्वज फडकत ठेवला असेल त्या काठिवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुलं किंवा हार यांसह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये
** ध्वजाचा तोरणं ‌ गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करु नये
** कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्वपूर्ण अशा राष्ट्रीय सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रमाच्या वेळी लावता येईल तथापि असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नये ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खाजगी रीत्या त्याची विल्हेवाट लावावी
** जेव्हा ध्वज मोकळ्या जागेत लावायचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारत न घेता शक्यतोवर तो‌ सुर्यास्त पर्यंत लावण्यात यावा
** ध्वज फाटेल अशा कोणत्याही रीतीने तो लावू नये किंवा बांधू नये आणि
** जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळलयामुळे खराब झाला असेल तेव्हा विशेषत जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याही पध्दतीने तो खाजगी रीत्या संपूर्णपणे नष्ट करावा
** कलम दोन **
** ध्वजाविषयी आदरभावना वृद्धिंगत करण्याचा उद्देशाने राष्ट्रध्वज शैक्षणिक संस्थांमध्ये शाळा महाविद्यालये क्रिडा शिबिरे बालवीरांची शिबिरे इत्यादी लावता येईल याबाबत मार्गदर्शनपर अनुदेशाचे एक आदर्श संच खालील प्रमाणे देण्यात आला आहे
** शाळेतील विद्यार्थ्यांनी मोकळ्या चौरस जागेवर शिस्तबद्ध रीतीने असे उभे रहावे की या चौरस जागेच्या तीन बाजूंस विद्यार्थी असतील आणि चौथ्या बाजूला ध्वज मध्यभागी ध्वजस्तंभ असेल. मुख्याध्यापक. नेता. विद्यार्थी नेता. ध्वज फडकविणारी व्यक्ति ध्वजस्तंभ पासून तीन पाऊले माग उभ राहतील
बाकीची ध्वज संहिता व कायदे कलम उद्याच्या मॅसेज मध्ये
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हकक व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा