“दिपकभाई आगे बढो”च्या देण्यात आल्या घोषणा
दोडामार्ग
आमदार दिपक केसरकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज भेडशी खालचा बाजार येथे समर्थकांकडून फटाके वाजवून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी “दीपकभाई तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी समर्थकांनी त्यांना पाठबळ दिले.यावेळी भेडशी गांधीचौकात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.
यावेळी उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले, नंदकिशोर टोपले, राजाराम उर्फ बाबा टोपले, सुनील महाजन,गौरीष वेटे राजेश जुवेकर, निलेश कुबडे, रामकृष्ण डांगी,उदय सरवणकर, मनोज बोंद्रे, तुषार करमळकर, ऋषिकेश करमळकर, गणपत काणेकर,सुचन करमळकर,यश काणेकर आदी उपस्थित होते.