You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयांमध्ये ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

श्री पंचम खेमराज महाविद्यालयांमध्ये ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाना सुरवात .

सावंतवाडी

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवां निमित्त श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये आज सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमांचा शुभारंभ झाला . या कार्यक्रमासाठी कोकण विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ संजय जगताप , सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले ,कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले , विश्वस्त , युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल , श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या अॅड. अश्विनी लेले, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी , एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी , तसेच महाविद्यालयाच्या कला वाणिज्य विज्ञान विभागाचे सर्व विद्यार्थी या सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयांमध्ये देशभक्तीपर समूह गीत गायन, पोवाडा ,चित्रकला ,रांगोळी स्पर्धा, पथनाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .

 

प्रतिक्रिया व्यक्त करा