You are currently viewing विषयावर प्रभूत्व असणारे शिक्षक मिळणे शाळेचे भाग्यच-प्रभाकर कुडतरकर

विषयावर प्रभूत्व असणारे शिक्षक मिळणे शाळेचे भाग्यच-प्रभाकर कुडतरकर

कासार्डे ज्यु.काॅलेजचे प्रा. रमेश मगदूम सेवानिवृत्त

तळेरे :- प्रतिनिधी

शाळा काॅलेजला अभ्यासू आणि विषयावर प्रभूत्व असणारे शिक्षक मिळणे हे त्या शाळेचे भाग्यच म्हणावे लागेल, आमच्या काॅलेजलाही प्रा. रमेश मगदूम सारखे इंग्रजी आणि इतिहास विषयावर प्रचंड प्रभुत्व असणारे शिक्षक आमच्या काॅलेजच्या विद्यार्थ्यांना मिळाले ही अभिमानाचा बाब असल्याचे गौरवोद्गार प्रभाकर कुडतरकर यांनी काढले.
कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.आर जे मगदूम नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने आयोजित सेवापुर्ती सोहळ्यात कार्याध्यक्ष प्रभाकर कुतरकर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था समितीचे सदस्य रविंद्र पाताडे, प्राचार्य एम.डी.खाड्ये, खारेपाटण महाविद्यालयचे प्राचार्य ए.डी. कांबळे,कासार्डे विद्यालयाचे माजी प्राचार्य आर.व्ही.नारकर,पालक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मारुती वळंजू,प्रा.सय्यद,
प्रा.इंदप- खारेपाटण, सत्कारमूर्ती प्रा. रमेश मगदूम,सौ.मगदूम व पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वती पुजन व दिप प्रज्वलनाने झाला त्यानंतर उपस्थित मान्यवर गुलाबपुष्प देऊन प्राचार्य मधुकर खाड्ये यांनी स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.मुगदूम म्हणजे हरहुन्नरी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी गौरव उद्गार प्राचार्य एम.डी. खाड्ये यांनी काढले.
………………………………..
बाॅक्स
*सोन्याची अंगठी आणि चांदीची गणेश मुर्ती देऊन सत्कारमूर्तींचा गुणगौरव*
कासार्डे विकास मंडळ मुंबई संस्थेच्यावतीने चांदीची गणेशमूर्ती तसेच ,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्त प्रा. मुगदूम यांचा तर सौ.मगदूम यांचाही साडी चोळीने ओटी भरून सत्कार करण्यात आला.शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कारमूर्तींचा सोन्याची अंगठी व पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
………………………………..
याप्रसंगी माजी प्राचार्य आर.व्ही.नारकर, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य ए.डी. कांबळे,प्रा.सय्यद
,शिक्षकांच्यावतीने पी.जे.काळे,ए.डी.नलवडे,सौ. बी.बी. बिसुरे,श्रीम.एस.डी.राणे,प्रा. डी.डी. देवरुखकर,आदींनी मनोगत व्यक्त करताना प्रा.मगदूम यांच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्यप्रणालीचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी सौ.मगदूम यांनी सर्वाचे आभार मानले तर विद्यार्थ्यीवर्गा मार्फत प्रणव हुले व कु. मालिनी लाड यांनी मनोगत व्यक्त केले.शेवटी पर्यवेक्षक श्री एन.सी. कुचेकर यांनी आभार मानून या सेवापूर्ती सोहळ्याची सांगता केली.

सेवानिवृत्त प्रा.रमेश मगदुम यांचा सत्कार करताना प्रभाकर कुतरकर, प्राचार्य खाड्ये,कांबळे,माजी प्राचार्य नारकर कुचेकर व इतर मान्यवर

छाया:-

प्रतिक्रिया व्यक्त करा