बांदा
एकच नारा एकच नारा ,हर घर झंडा हर घर झंडा अशा घोषणा देत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा झेंडा लावण्याबाबत जनजागृती करणेसाठी ग्रामपंचायत बांदा व जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं 1 यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली .
बांदा ग्रामपंचायत सरपंच अक्रम खान यांच्या उपस्थित ही प्रभातफेरी सुरू करण्यात आली या प्रभातफेरीत सरपंच अक्रम खान,बाळू सावंत , राजेश विर्नोडकर, जावेद खतिब,रिया आल्मेडा , स्वप्नाली पवार, केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, सरोज नाईक, उर्मिला मोर्ये,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, प्रशांत पवार, गोपाळ साबळे,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, जागृती धूरी, शितल गवस उपस्थित होते,यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल व विविध घोषणांनी बांदा केंद्रशाळेपासून गांधी चौक ,उभा बाजार,कट्टा कार्नर या परिसरात जनजागृती केली. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शिक्षक व विद्यार्थी यांनी सायकलवरून काढलेली ही जनजागृती रॅली आकर्षक ठरली.