You are currently viewing जगातील सर्वोत्तम कृत्रिम पाय देण्याचे निलेश राणेंनी दिले बांदा उपसरपंचांना आश्वासन

जगातील सर्वोत्तम कृत्रिम पाय देण्याचे निलेश राणेंनी दिले बांदा उपसरपंचांना आश्वासन

बांदा

रस्ते अपघातात पाय जायबंदी झालेल्या बांदा उपसरपंच हर्षद कामत यांच्या तब्येतीची माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जात चौकशी केली.

जगातील सर्वोत्तम कृत्रिम पाय लावून देऊन पुन्हा पायावर उभे करण्याची जबाबदारी माझी असा ठोस शब्द यावेळी निलेश राणे यांनी कामत कुटुंबियांना दिला. त्यानंतर तुम्ही केवळ चालणार नाही तर पळू शकाल असा धीरही त्यांनी दिला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खा. निलेश राणे हे आज बांद्यात खासगी कामानिमित्त आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा