*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पोघा फुलतो …*
अहो ज्वारी जेव्हा वयात येते, पोघा फुलतो मांडीत
भर ज्वानीतली नार मग ही .. येते मोती उधळीत
… जी जी र जी जी ..जी र र जी जी …
बांधावरती अशी मुरकते राघू घालती मग पिंगा
हिरव्या शालू मध्ये नटूनी बांधावरती मग दंगा
ओऽऽऽ जी जी र.. जी जी र जी…
टवाळ ती पांखरे मारती चोची मागून मग चोची
नार ती गरती होऊन जाते पुरती तिची हो,मग गोची..
जी र र जी जी .. जी र र जी जी हो…
अंगा अंगाने भरते ज्वारी टपोर दाणं मोत्याचं
शेतकरी अन् ज्वारीचं मग नातं जुळतं पोत्याचं..
ऽऽऽऽ जी र र जी जी …ऽऽऽ
मोती पोवळं येता घराला..पुजा होई लक्ष्मींची
नऊवारीतील नार जवारी घरदाराला भाग्याची..
ऽऽऽऽ जी र र जी जी ..हो …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ४ ॲागष्ट २०२२
वेळ : रात्री ७ : ४८