मुंबई प्रतिनिधी / स्नेहा नाईक :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियावर(फेस बुक) लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री राज्यातील जनतेला संबोधित केलं
मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा जंगल घोषित केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
आहे. यावेळी त्यांनी महत्वाची घोषणा आरे कारशेड कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. आरे कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे सरकारने मागे घेतले आहे.
आरे कारशेड रद्द करण्यात आलं असून मेट्रोसाठी नवं कारशेड हे कांजूरमार्गला होणार कांजूरमार्ग येथील जागा ही शासकीय जागा असल्याने त्यासाठी आपल्याला १ रुपया देखील खर्च करावा लागणार नाही अस मुख्यमंत्री म्हणाले.आरे जंगलात साधारण १०० कोटींचा खर्च करून एक बिल्डींग उभारली आहे. ते पैसे वाया जाणार नाहीत. बिल्डींग अन्य कारणासाठी वापरणार आहोत. एकही पैसा वाया जाऊ देणार नाही, असं ते म्हणाले.
आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. त्यावेळी ६०० एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून ८०० एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत ८०० एकराचं जंगल असणार आहे. आहे ते टिकवणं आपलं काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.