सावंतवाडी
जगद्गुरु नरेंद्र महाराज भक्त मंडळाकडून सावंतवाडी शहर व परीसरासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महामार्गावर किंवा मुख्य रस्त्यावर होणारे अपघात व त्यावेळी संबंधित जखमीला तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या सेवेचे लोकार्पण आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शंकर कोरे, प्रादेशिक परिवहन निरीक्षक मारुती चौगुले आदी उपस्थित होते.