बाळा गावडे यांच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विभागीय मेळावा संपन्न
महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्तात लढण्याची वृत्ती आहे. २०१४ मध्ये देखील युती तुटली होती तेव्हा देखील शिवसेनेविरोधात संपूर्ण देशातील भाजप उतरले होते. त्यांचा मराठी माणसाबद्दल द्वेष वेळोवेळी त्यांनी केलेल्या कृतीवरून व वक्तव्यावरून दिसून येत आहे. त्यामुळेच मराठी माणसाचा पाठींबा असलेला शिवसेना पक्ष संपविण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करत आहेत. मात्र दिल्लीच्या हुकूमशहांना रोखण्याची ताकद महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. खासदार आमदार फोडाल परंतु सर्वसामान्य जनतेला हे लोक फोडू शकत नाहीत. नारायण राणेंनी बंड केले तेव्हा त्यांच्या सोबतही अनेक आमदार गेले होते परंतु ते पुन्हा निवडून आले नाही. स्वतः नारायण राणे सुद्धा ५ वर्षांनंतर पुन्हा निवडून आले नाहीत हा सिंधुदुर्गचा इतिहास आहे. सिंधुदुर्गची जनता हि शिवसेनेच्या पाठीशी खंबीर असून सर्वांच्या हृदयात असलेले बाळासाहेबांचे नाव कोणीही कमी करू शकत नाही. असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विभागीय मेळावा संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. तसेच बाळा गावडे यांच्या समर्थकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांना शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यामध्ये बाळा गावडे यांचे समर्थक किरण गावडे, संदीप कोठावळे, रघुवीर देऊलकर, महेश धुरी, गणपत पेडणेकर, सिद्धेश कुडव, दिगंबर परब, न्हानू कानसे, प्रदीप कोठावळे, प्रवीण कोठावळे, उमेश मोरजकर, बाबूल खान, अमोल भांबुरे, राजू गावडे, दिनेश गावडे, अभिनय गावडे, नितेश पालव, बाबुराव पालव, निळकंठ सावंत, रुपेश परब, सचिन कुडव, विनायक परब, शंकर नाईक, संतोष गावडे, सौ. देऊलकर, बंड्या हळदणकर, रतन पालव, मिलिंद देसाई, दीपक नाईक, गुंजन यादव, सचिन आचरेकर, मुमताज खान, तुषार कानसे, रामचंद्र कोठावळे यांसह असंख्य नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, इन्सुली विभागप्रमुख फिलिक्स रॉड्रिक्स, विष्णू परब, सरपंच श्री. वेंगुर्लेकर, उपसरपंच काका चराठकर, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, गावकर सर, युवासेना उपतालुकाप्रमुख गुणाजी गावडे, कौस्तुभ गावडे, सुंदर आरोसकर, सुरेश सावंत, कृष्णा सावंत, केतन वेंगुर्लेकर, उल्हास गावडे, आपाकृष्णा आमडोस्कर, शिवा सावंत, संजय राणे, दिलीप कोठावळे, विनोद गावकर, मंथन गवस, राजन परब, मंगेश गावडे, शिवा नाईक, राजू केरकर, भाग्यवान धुरी, सुनील देसाई, दत्ताराम पेडणेकर, पूजा पेडणेकर, आरती परब, सोनाली मेस्त्री, संतोष मेस्त्री, आदी उपस्थित होते.