You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह तात्काळ सुस्थितीत करा – देव्या सूर्याजी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह तात्काळ सुस्थितीत करा – देव्या सूर्याजी

अन्यथा युवा रक्तदाता संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा…

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहातील फ्रीजर बंद अवस्थेत आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहेत, असा आरोप युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केला आहे. दरम्यान बांधकाम व रुग्णालय प्रशासनाने तातडीने याबाबत योग्य ती भूमिका घेवून बंद असलेला फ्रीजर कायमस्वरूपी सुस्थितीत करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, अन्यथा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याबाबत श्री. सूर्याजी यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेला शवागृहातील फ्रीजर बंद आहे. त्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून पर्यायी बांदा ग्रामीण रुग्णालयामध्ये सोय करावी लागते. दोन मृतदेहांची अशीच अवहेलना नुकतीच झाली आहे. तर दुसरीकडे मृतदेह ठेवण्यासाठी अन्य खासगी व समाजसेवी संस्थांचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली असून रुग्णालय प्रशासनाने मरणानंतर मृतदेहाची अवहेलना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा