You are currently viewing Whats app मध्ये नवे फीचर्स….

Whats app मध्ये नवे फीचर्स….

वृत्त संस्था

 

प्रतिनिधी : स्नेहा नाईक

 

WhatsApp आपल्या बीटा व्हर्जनमध्ये नवीन अपडेट टेस्ट करत होते. पण आता सर्व युझर्ससाठी हे नवीन अपडेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर लोकप्रिय असणारं  WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमी वेगवेगळे फीचर्स आणत असतं. आतादेखील त्यांनी युजर्ससाठी नवीन अपडेट आणले आहेत. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी  WhatsApp हे जगभरातील सर्वात लोकप्रिय अप आहे. मागील काही काळापासून WhatsApp आपल्या बीटा व्हर्जनमध्ये  नवीन अपडेट टेस्ट करत होते. पण आता सर्व युझर्ससाठी हे नवीन अपडेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अॅप अपडेट केलं नसेल तर लवकर करा.

 

कसं कराल या फीचर्स चा वापर!!!

 

या नवीन फीचर्समध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या नवीन इमोजीदेखील मिळणार आहेत. Advance Search नावाचा नवीन पर्याय तुम्हाला WhatsApp मध्ये मिळणार आहे. यामध्ये अपडेट केल्यानंतर तुम्ही या फीचर्सचा लाभ घेऊ शकणार आहे. या नवीन अपडेटमुळे तुम्हाला तुमच्या Whatspp वरील फाईल, फोटो आणि व्हिडीओ लवकर सापडण्यास मदत होणार आहे.

 

यासाठी तुम्हाला Google Play Store वर जाऊन तुमचं  WhatsApp  अपडेट करावं लागणार आहे. सध्या हे नवीन  Advance Search केवळ अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात हे नवीन फिचर केवळ WhatsApp Business अकाउंट असणाऱ्या युझर्सना मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे नवीन फिचर मिळालं नाही तर थोडी वाट पाहावी लागणार आहे.

 

या फीचर्सचा वापर करण्यासाठी तुम्ही तुमचं WhatsApp उघडल्यावरया  नवीन फीचरवर जाऊन तुम्ही जो फोटो किंवा व्हिडीओ आहे त्याच नाव टाकलं असता सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक फोटो चेक करण्याची गरज नाही. केवळ तुमच्या फाईलचं नाव टाकून तुम्ही माहिती शोधू शकता.

 

याचबरोबर या नवीन फीचर्ससह तुम्हाला नवीन इमोजीदेखील मिळणार आहेत. WhatsApp ने आपल्या इमोजीमध्ये नवीन भर टाकली असून शेफ, शेतकरी, पेंटर यांसारख्या नवीन इमोजींचा समावेश केला आहे. त्याचबरोबर व्हीलचेअरवाल्या नवीन इमोजींचा देखील यामध्ये समावेश केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा