मनसेच्या उपक्रमाचे स्वागतच..परंतु यापुढे जिल्ह्यातील जनतेला रुग्णालयीन समस्यांबाबत तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही अशी दिली ग्वाही..!
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी मनसेच्या जिल्हा रुग्णालयासमोरील मदत केंद्रास सदिच्छा भेट दिली. सोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील हेसुद्धा हजर होते. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मनसेच्या मदत केंद्रातील तक्रार नोंद रजिस्टरची पाहणी करून आजपर्यंत मदत केंद्रास संपर्क केलेल्या जनतेच्या तक्रारींची पडताळणी करून तक्रारींचे स्वरूप जाणून घेतले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यापुढे माझ्या कार्यकाळापासून रुग्णालयातील समस्यांबाबत व आरोग्य यंत्रणेचे निगडित कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आपल्यापर्यंत येतील अशी वेळच येऊ देणार नाही अशी ग्वाही मदत केंद्र प्रतिनिधी सचिन मयेेकर यांना दिली.तरीही आरोग्य यंत्रणेशी संबंधित कोणत्याही स्वरूपाच्या सूचना वा दोष आढळून आल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष श्री प्रसाद गावडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेचं व सुसज्ज आरोग्य सेवा देण्याच्या निर्धाराचं स्वागत केलं आहे.